“याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत | subodh bhave share thank you instagram post after birthday celebration nrp 97

“याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत | subodh bhave share thank you instagram post after birthday celebration nrp 97

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या सुबोध भावे त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकतंच सुबोध भावेचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. सुबोधने काल (९ नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचा एक कोलाज फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : मी भूमिका साकारावी ही छत्रपती शिवरायांची इच्छा होती : सुबोध भावे

सुबोध भावेची पोस्ट

“माझ्या जन्मदिनी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्या कायम स्मरणात राहतील. माझ्या परीने मी सर्वांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला,पण मला माहिती आहे की सगळ्यांना तो देऊ शकलो नाही. तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे आणि नेहमीच असीन. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो.

काय मिळवलं?-
खऱ्या आयुष्यात आभाळाएवढ मोठं काम करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. प्रभू श्री राम, छत्रपती शिवराय, निवृत्ती महाराज, तुकाराम महाराज, बिरबल, पहिले बाजीराव, बसवेश्वर महाराज, लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर!

स्वतःचे वेगळं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या काल्पनिक व्यक्तिरेखा साकारता आल्या. आणि कलेवर उदंड प्रेम करणारे तुमच्या सारखे रसिक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार!

याच साठी केला होता अट्टहास…..(या फोटोंच्या कोलाज साठी दिव्या ठोंबरे चा आभारी आहे)”, असे सुबोध भावेने पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या चित्रपटातून इतिहासाची तोडमोड करुन दाखवण्यात आल्याचे बोललं जात आहे.

Aniket Ghate