महेश मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीड दौडले सात’ वादात असताना नवी माहिती समोर, चित्रपटात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची एंट्री | director mahesh manjrekar movie vedat marathe veer daudale saath actress shivani surve play role see details

महेश मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीड दौडले सात’ वादात असताना नवी माहिती समोर, चित्रपटात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची एंट्री | director mahesh manjrekar movie vedat marathe veer daudale saath actress shivani surve play role see details

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटामधील सात कलाकारांच्या मुख्य भूमिका आणि त्यांच्या लूकबाबतही सांगण्यात आलं. सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटामधील सात वीरांची नावं बदलण्याचा आरोप महेश मांजरेकर यांच्यावर करण्यात आला. आता या वादादरम्यान चित्रपटामध्ये एका नव्या अभिनेत्री एंट्री झाली आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, सत्या मांजरेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. आता अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या नावाची या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या कार्यक्रमाला पाहुणी म्हणून शिवानी आली होती. पण याचदरम्यान शिवानीला तुही या चित्रपटात काम करणार आहेस असं महेश मांजेरकरांनी सांगत सरप्राइज दिलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “महेश मांजरेकर सरांचं आमंत्रण आलं म्हणून या कार्यक्रमामध्ये पाहुणी म्हणून आले होते. इथे आल्यानंतर मला कळालं की मी या चित्रपटाचा भाग आहे. या चित्रपटामध्ये मी काम करणार हे सरांनी आधीच ठरवून ठेवलं असावं. पण त्यांनी हे गुपित ठेवलं.”

आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा

पुढे ती म्हणाली, “अक्षय कुमार सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करणार आहे त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” महेश मांजरेकर यांनी शिवानीला चित्रपटामध्ये काम देण्याबाबत वचन दिलं होतं. ते त्यांनी या चित्रपटाच्यानिमित्ताने पूर्ण केलं. आता शिवानी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या तयारीला लागली आहे.

Aniket Ghate