नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सई ताम्हणकरला देण्यात आली विचित्र वागणूक, म्हणाली, “मला त्याक्षणी…” | marathi actress sai tamhankar talk about how she get ignore at red carpet in award shows watch video

नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सई ताम्हणकरला देण्यात आली विचित्र वागणूक, म्हणाली, “मला त्याक्षणी…” | marathi actress sai tamhankar talk about how she get ignore at red carpet in award shows watch video

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमघ्ये सई ताम्हणकरचं नाव टॉपला आहे. सईने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं. ती इथवरच थांबली नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सईला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं. तिच्यासाठी हा क्षण अगदी सुखद होता. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सईने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

आणखी वाचा – कर्करोगामुळे केस गेले म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्रीला शोमधूनच काढलं बाहेर, म्हणाली, “केमोथेरपी झाल्यानंतर…”

काय म्हणाली सई ताम्हणकर?
‘सिद्धार्थ कननला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सई आपल्या कामाबाबत तसेच चित्रपटांबाबत बोलताना दिसली. यावेळी तिला रेड कार्पेटवर किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तू गेली आहेस आणि प्रसारमाध्यमांनी कॅमेरा दुसरीकडेच फिरवला असं कधी झालं आहे का? असा प्रश्न सईला विचारण्यात आला.

तेव्हा ती म्हणाली, “हो असं माझ्याबरोबर घडलं आहे. यंदाच्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्येही हा प्रकार माझ्याबरोबर घडला. प्रसारमाध्यमांकडून असं करण्यात आलं.” यावेळी कोणी तुझ्याबरोबर असं केलं? हा प्रश्न विचारताच सईने ती नावं घेण्यास नकार दिला. सईसाठी हा प्रकार दुखावणारा होता.

जेव्हा तुला रेड कार्पेटवर डावलण्यात येतं तेव्हा तुझ्या मनात काय भावना असतात असंही सईला विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “मला त्याक्षणी थोडं फार दुःख वाटतं आणि ते स्वाभाविकच आहे. पण अशा प्रकारांमुळे मला काम करण्याची अधिक ताकद मिळते. एक दिवस असा येईल की तुम्ही माझ्यासाठी येणार आणि मी तिथून निघून जाईन. या सगळ्यांना उत्तर फक्त आणि फक्त मी माझ्या कामामधूनच देणार आहे.” सईने या मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारेही शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Aniket Ghate