नातवाला छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात… | mns raj thack Thackeray on his grandson har har mahadev subodh bhave movie on chatrapati shivaji maharaj see details

नातवाला छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात… | mns raj thack Thackeray on his grandson har har mahadev subodh bhave movie on chatrapati shivaji maharaj see details

झी स्टुडिओज निर्मित व अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आवाज देण्याचं कसं ठरलं? त्यामागचे किस्से सांगितले. यावेळी सुबोध भावेने राज ठाकरे यांना त्यांच्या नातावाबाबतही प्रश्न विचारला. या प्रश्नाला राज ठाकरे यांनी अगदी हसत उत्तर दिलं.

तुम्ही आता आजोबा झाले आहात. तर कियानला छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर कोणती गोष्ट तुम्ही आधी सांगाल? असा प्रश्न सुबोध भावेने राज ठाकरे यांना विचारला. सुबोध भावेच्या या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितही हसू लागले.

आणखी वाचा – “…तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सर्व चित्रपटात व्हॉईस ओव्हर द्यायला लावला”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

राज ठाकेर म्हणाले, “कसं आहे मुलगा असल्यामुळे त्यात ठाकरे आहे म्हणून लढायांबाबतच त्याला सांगायला लागेल असं वाटतंय. तो मोठा झाल्यावर मी त्याला मी सगळ्या गोष्टी सांगेन. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी रामायण-महाभारताच्या कथा ऐकवल्या होत्या. हेच जे संस्कार आहेत ते पुढे चालू ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे.”

Aniket Ghate