जगाच्या अंताचा काउंटडाउन सुरु झालाय का? ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित | Whistle Blowing Suit marathi Movie Trailer release video viral nrp 97

जगाच्या अंताचा काउंटडाउन सुरु झालाय का? ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित | Whistle Blowing Suit marathi Movie Trailer release video viral nrp 97

सध्या संपूर्ण सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करुन उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध प्रथमच, एका भारतीय चित्रपटात तोही आपल्या मराठी चित्रपटात घेतला जात आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचा प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट आहे. ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटात मानव आणि पृथ्वीच्या परस्पर संबंधांचा वेध घेतला गेला आहे. त्याबरोबर मानवी उत्क्रांतीही मांडली आहे. एका अत्यंत क्लिष्ट विषयाला मनोरंजक कथेद्वारे मांडणाऱ्या या चित्रपटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याबरोबर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही ‘ग्लोबल वार्मिंग’ ही संकल्पना, समस्या आणि त्यावरील उपाययोजना या चित्रपटाद्वारे मांडली जाणार आहे.
आणखी वाचा : बॉलिवूडकरांची दिवाळी पार्टी दणक्यात; पण चर्चा मात्र माधुरी आणि काजोलच्या डान्सचीच…, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाचे भारुन टाकणारे संगीत, चित्रपटाची शैली, अनेक पातळीवर भाष्य करणारे दिग्दर्शन, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष मेहनत आणि त्यावरुन तयार केलेली स्क्रीप्ट ही या चित्रपटाची काही वैशिष्टये आहेत. या चित्रपटात ‘नोंकझोक’ या हिंदी मालिकेत काम करणारी बालकलाकार अभिनेत्री विशाखा कशाळकर झळकणार आहे. तिने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटातील विशाखाची भूमिका अत्यंत आव्हानात्मक दाखवण्यात आली आहे.

लेखक दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या ‘आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन’ या होम प्रोडक्शनची ही भव्य निर्मिती आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी धाडसी विषयाला हात घालण्यात आला आहे. ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या मराठीतील पहिल्या विज्ञानपटासंदर्भातील उत्कंठा सध्या शिगेला पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदा असा आगळावेगळा जागतिक प्रश्नांना भिडणारा विज्ञानपट निर्माण झाला आहे याचे कौतुक होताना दिसत आहे.

Aniket Ghate