“चित्रपट चालवायचा म्हणून….” ‘३६ गुण’ चित्रपटातील बोल्ड दृश्यांवर पूर्वा पवार स्पष्टच बोलली | marathi actress Purva Pawar talk about Santosh Juvekar starrer 36 Gunn movie bold scene nrp 97

“चित्रपट चालवायचा म्हणून….” ‘३६ गुण’ चित्रपटातील बोल्ड दृश्यांवर पूर्वा पवार स्पष्टच बोलली | marathi actress Purva Pawar talk about Santosh Juvekar starrer 36 Gunn movie bold scene nrp 97

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हटले जाते. समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक बोल्ड दृश्य दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री पूर्वा पवार हिने यातील बोल्ड दृश्यांबद्दल भाष्य केले आहे.

‘३६ गुण’ या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका आहे. त्याबरोबरच या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक बोल्ड दृश्य दाखवण्यात आले आहेत. यावरुन या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नुकतंच या सर्व दृश्यांवर पूर्वाने मौन सोडले आहे. सकाळ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

पूर्वा पवार नेमकं काय म्हणाली?

“मला कुणीही बोल्ड म्हटलेले नाही. कारण ते मला ओळखतात. मी माणूस म्हणून विचाराने बोल्ड आहे. पण मला या बोल्ड शब्दाचा अर्थ कळालेला नाही. मराठीत या शब्दाचा नेमका अर्थ काय हे मला अजून कोणीही नीट सांगितलेले नाही. मराठीत बोल्डला काय म्हणतात, हेही मला सांगू शकलेले नाही. पूर्वीच्या काळी अगदीच काही चित्रपटात ते दाखवायचं नाही. पूर्वी चित्रपटात प्रणयप्रसंग हा वेगळ्या पद्धतीने चित्रित केला जायचा. आता जे प्रणयप्रसंग आहेत ते प्रत्यक्ष आयुष्यात घडतात. जो ते करत नाही, असे म्हणतो त्याला आपण खोटं बोलतोय असे बोलून मोकळे होतं.

पण हे प्रत्यक्ष घडतं असं आता दाखवतात ज्याला आपण बोल्ड म्हणतो. हा चित्रपट फार खरा आहे. त्यामुळे ते सर्व खरं ठेवण्याचा प्रयत्न होता. काहीही खोटारडेपणा किंवा कमतरता न ठेवता हा चित्रपट असाच असणार आहे. हा चित्रपट असाच चित्रित केला जाणार आहे, तसाच तो दिसणार आहे. त्यामुळे आम्हीही त्यात १०० टक्के ओतून काम केले आहे. मला ते कुठेही काहीही खटकलं नाही. हे उगाच का करतोय, हे बरोबर नाही, असं मला कुठेही वाटलं नाही, असं काहीही झालेलं नाही. चित्रपट चालवायचा म्हणून हा केलेला प्रयत्न अजिबात नाही. हे खऱ्या आयुष्यात जे घडतं त्या अनुभवावरुन आलेल्या घटना आहेत आणि त्यावरुन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

सध्या ओटीटी अॅपवर अनेक गोष्टी उघडपणे दाखवल्या जातात. मग आपण का ते लपवतोय, त्यातून आपण काय साध्य करतोय हेच मला समजत नाही. आपला प्रेक्षक या गोष्टी स्विकारणारा आहे. त्यांनी यापूर्वीही या गोष्टी स्विकारल्या आहेत. त्यात ते हनिमूनला गेले आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की ते तिकडे जाऊन काही वेगळं करतील अशी अपेक्षा असू शकते?” असा प्रश्न पूर्वाने विचारला आहे.

आणखी वाचा : “हमको साथी मिल गया…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली

दरम्यान बोल्ड पण विचार करायला लावणाऱ्या धमाकेदार ट्रेलरमधून आजची पिढी लग्नव्यवस्थेतील किचकट, मानसिक ताणतणावाची प्रक्रिया बदलू पाहते आहे याची झलक पाहायला मिळते. नाती आशा-अपेक्षांच्या व्यापारात गोवली जाऊ नयेत. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न ‘३६ गुण’ चित्रपटातून करण्यात आला आहे.

‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

Aniket Ghate