चाहत्यांनी दिलेली अनमोल भेटवस्तू पाहून मुक्ता बर्वे भावूक; फोटो शेअर करत म्हणाली, “प्रत्येक फॅन तुम्हाला…” | fans gives precious gift to marathi actress mukta barve she express her feelings on social media

चाहत्यांनी दिलेली अनमोल भेटवस्तू पाहून मुक्ता बर्वे भावूक; फोटो शेअर करत म्हणाली, “प्रत्येक फॅन तुम्हाला…” | fans gives precious gift to marathi actress mukta barve she express her feelings on social media

सध्या सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील अंतर फारच कमी झालं आहे. आपला आवडता स्टार सेलिब्रिटी काय करतो, कुठे आहे, कुणाबरोबर आहे याविषयी माहिती चाहत्यांना अगदी सहज मिळते. सध्याच्या कित्येक सेलिब्रिटी लोकांनाही ही गोष्ट फार आवडते. याचा गैरफायदा घेणारे काही चाहते असतात तसेच या गोष्टीतून एका कलाकाराला घडवणारेही काही चाहते असतात. अशाच आपल्या चाहत्यांबद्दल एक पोस्ट शेअर करताना मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे भाऊक झाली आहे.

तिच्या ३ चाहत्यांनी नुकतंच मुक्ताला तिचंच एक सुंदर पोर्ट्रेट भेट म्हणून दिलं आहे. हे पोर्ट्रेट पाहून मुक्ता फारच भावूक झाली. खरंतर या तिघांना ती बरेच वर्षं ओळखत असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. पण त्यांनी दिलेली ही भेटवस्तू पाहून मुक्ता चांगलीच भारावून गेली आहे. भोपाळच्या एका दिग्गज कलाकाराकडून हे पोर्ट्रेट काढल्याचंही मुक्ताने शेअर केलं आहे. आपल्या या चाहत्यांबरोबर आणि त्या सुंदर पोर्ट्रेटबरोबर एक फोटो शेअर करत मुक्ताने तिच्या भावना तिच्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : शेवट ते सुरुवात असा उलटा चित्रित झालेला रणबीरचा ‘रॉकस्टार’; जाणून घ्या आणखी धमाल गोष्टी

मुक्ता म्हणते, “ते सुंदर पोर्ट्रेट बघितलं आणि मी वेडी झाले. पोर्ट्रेट तर सुंदर होतंच पण त्यासाठी घेतलेले कष्ट त्याहीपेक्षा मोठे होते. खास भोपाळ च्या एका फार मोठ्या कलाकाराकडून ते बनवून घेतलंय. स्वप्ना ,देवप्रसाद आणि हेरंब ही मंडळी मला पहिल्यांदा नेमकी कधी भेटली याची आठवण नाही कारण अनेक वर्ष उलटली .पण वेगवेगळ्या फोटोमध्ये छोटासा असलेला हेरंब हळू हळू माझ्या उंचीला आला एवढा काळ मात्र नक्कीच उलटला. तुमच्या कामावर मनापासून प्रेम करणारा प्रत्येक फॅन तुम्हाला कलाकार म्हणून घडवत असतो. अशी फॅन -चाहते म्हणून आयुष्यात आलेली माणसं नकळत तुमच्या जगण्याच्या प्रवासाचा एक भाग होऊन जातात. त्यातलेच स्वप्ना देवा आणि हेरंब. मी माझं काम मनापासून करावं यापेक्षा दुसरी कुठली अपेक्षा नाही, कधी ओळख आहे म्हणून हक्क गाजवणं नाही, कधी जास्त अघळ-पघळ बोलणं नाही. हे माझ्यावर फक्त भरभरून प्रेम करणारे माझे हितचिंतक. खूप खूप मनापासून थँक्स . खूप प्रेम.”

मुक्ताच्या पोस्टवर या पोर्ट्रेटचं आणि तिच्या या हितचिंतकांचं लोकांनी कौतुकही केलं आहे. मुक्ता ही नुकतीच ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत आपल्याला दिसली, शिवाय ‘आपडी थापडी’ या चित्रपटाच्या माध्यमातूनही ती आपल्यासमोर आली. शिवाय तिचं ‘चारचौघी’ हे नाटकही रंगमंचावर चांगलंच गाजतंय. मुक्ताच्या अभिनयाची सगळेच प्रेक्षक प्रशंसा करत आहेत.

Aniket Ghate