आधी राज ठाकरेंच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी, आता पुण्यात पोहोचली प्राजक्ता माळी, कुटुंबासह फोटो शेअर करत म्हणाली… | actress prajakta mali diwali celebration with family share photos on instagram see details

आधी राज ठाकरेंच्या दीपोत्सव कार्यक्रमात हजेरी, आता पुण्यात पोहोचली प्राजक्ता माळी, कुटुंबासह फोटो शेअर करत म्हणाली… | actress prajakta mali diwali celebration with family share photos on instagram see details

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दिवाळी सेलिब्रेशन व्यग्र आहे. मनसे दीपोत्सवालाही तिने हजेरी लावली होती. यादरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यादरम्यान तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच काही फोटोंमध्ये ती राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवतानाही दिसली. आता प्राजक्ता आपल्या कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करत आहे.

आणखी वाचा – Video : भांडूपच्या चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

प्राजक्ता सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवणं तिला फार आवडतं. चित्रीकरणामधून मिळालेल्या वेळेमध्येही प्राजक्ता कुटुंबियांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसते. इतकंच नव्हे तर बऱ्याचदा त्यांच्याबरोबर ती व्हॅकेशनही एण्जॉय करते. आताही प्राजक्ताचं जोरदार दिवाळी सेलिब्रेशन सुरु आहे.

प्राजक्ता दिवाळी सेलिब्रेशनसाठी पुण्यामध्ये पोहोचली आहे. पुण्यामध्ये तिच्या कुटुंबातील मंडळी राहतात. चित्रीकरणानिमित्त मुंबईमध्ये असताना तिला कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही. पण आता दिवाळी सणानिमित्त ती कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे.

आणखी वाचा – आधी दिली प्रेमाची कबुली आता बॉयफ्रेंडसह दिवाळी साजरी करतेय वनिता खरात, फोटो व्हायरल

कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. लक्ष्मीपुजनाचे फोटो शेअर करत आपण कशाप्रकारे दिवाळी साजरी करतो हे प्राजक्ता सांगताना दिसत आहे. प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनीही बरीच पसंती दर्शवली आहे. तसेच तिला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Aniket Ghate