अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…” | marathi actress sai tamhankar talk about her ex husband says we drank all night during party and still i meet him see details

अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…” | marathi actress sai tamhankar talk about her ex husband says we drank all night during party and still i meet him see details

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं. आपल्या भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. ती स्वतः आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा – नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सई ताम्हणकरला देण्यात आली विचित्र वागणूक, म्हणाली, “मला त्याक्षणी…”

सईचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असतं. आताही ती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात. पण पूर्वाश्रमीच्या पतीबाबत सईने यापूर्वी बोलणं बऱ्याचदा टाळलं. पण नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आताही पूर्वाश्रमीच्या पतीशी मी बोलत असल्याचं सांगितलं.

सई म्हणाली, “आताही मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटते. ते क्षण मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते. तसेच ज्या दिवशी दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन जेव्हा सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं. तसेच आमच्या घटस्फोटाबाबत सांगितलं.”

आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा

पुढे सई म्हणाली, “रात्रभर आम्ही दारू प्यायलो. एन्जॉय केलं. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. त्याच्या नावाचे टॅटूही मी काढले आहेत. अजूनही ते टॅटू तसेच आहेत. एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. मग त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणूनही आजही ते टॅटू मी मिरवते.” सईच्या या उत्तरानंतर सिद्धार्थ कननही तिचं कौतुक करतो.

Aniket Ghate